सुस्वागतम्
पतसंस्था विश्व मध्ये आपले स्वागत आहे .आम्ही तुमच्या पैशाचे मूल्य अबाधित ठेवण्यासाठी अनेक रीतीने प्रयत्न करीत आहोत. तुमचा कष्टाचा पैसा सुरक्षित कसा ठेवावा याची माहिती तुम्हाला देणे हा या प्रयत्नांचाच एक भाग आहे. हे संकेतस्थळ आता माय मराठीत उपलब्ध करून देण्यात आले आहे. विविध प्रकारच्या ठेवी व कर्जे, त्याला लावण्यात येणारे व्याजदर, कर्जाची मुदत, व्याजावरील सवलती, तसेच कर्जासाठी लागणारे दस्तऐवज, या आणि अशा नेहमी उपस्थित केल्या जाणार्या प्रश्नांची उत्तरे या संकेतस्थळावर मिळतील.
लाभांशावर निर्बंध
कोणतीही संस्था सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्या यांच्या पूर्व मंजुरीने असेल ते खेरीज करुन सदस्यांना १५ टक्क्यांपेक्षा अधिक दराने लाभंश देणार नाही.[ सन १९९४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २०,कलम २३ अन्वये कलम ६७ बदली करण्यात आले.]
नाणेबाजाराची परीस्थिती व सहकारी चळवळीचा वाढता व्याप लक्षात घेउन अधिकाधिक भांडवलाचा ओघ या चळवळीकडे वळविण्याचे दृष्टीने लाभांशाची मर्यादा ९ टक्क्यांवरुन १५ टक्क्यांवर नेली असावी. पू्र्वी ही मर्यादा १२ टक्क्यांपर्यंत होती. ती नंतर ७ १/२ केली व त्यानंतर ६ १/४ केली होती.
सहकारी संस्थांमध्ये सभासदांनी जे भांडवल गुंतवलेले असते अशा सदस्यांना त्यांचे...
देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेतील आपल्या सर्व ५९.७ टक्के भागभांडवलाची भारतीय रिर्झव्ह बँकेने शुक्रवारी केंद्र सरकारला विक्री केली. रिर्झव्ह बँकेने दहा रुपये दर्शनी मूल्याच्या ३१.४३ कोटी शेअर्सची ३५,५३१.३३ कोटी रुपयांना सरकारला विक्री केल्याची माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाकडून मुंबई शेअर बाजाराला देण्यात आली. या शेअर हस्तांतरणास कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. स्टेट बँकेच्या शेअरचा भाव मुंबई शेअर बाजारात शुक्रवारी ५४.९५ रुपयांनी (३.७४ टक्क्यांनी) वाढून शेवटी १,५२५.३० रु.वर स्थिरावला. या व्यवहाराची माहिती स्टेट बँकेने आधीच शेअर बाजारांना दिली होती. रिर्झव्ह बँकेच्या मालकीचे हे शेअर्स खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारने २१...